Sanjay Raut : निलेश राणेंनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन संजय राऊतांनी घेतला समाचार
Sanjay Raut Press Conferance : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात टार्गेट दिलं जातंय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गोव्याच्या विजयाचे शिल्पकार जरी म्हटलं गेलं असलं, तरी गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही, तिथं व्यक्तीच जिंकते आणि त्या व्यक्ती सरकार बनवतात, असंही ते म्हणाले आहेत. त्यासोबतच शरद पवारांबाबत निलेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुनही राऊतांनी समाचार घेतला आहे.























