एक्स्प्लोर

जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'

बीडच्या माजलगाव शहरातील एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी तो बोलत होता. यावेळी बीडच्या सामाजिक स्थितीवर त्याने परखड भाष्य केलं.

Sandeep Pathak: महाराष्ट्राला जातीचं राजकारण नवं नाही. आपल्या आजूबाजूला जाती-धर्माची पुटे इतकी चढत गेली आहेत की आपण एकटे पडले आहोत. मुळचा बीडचा असलेला मराठी अभिनेता संदीप पाठक अलीकडेच महाराष्ट्रात होत असलेल्या जातीय आणि धर्मामुळे होत असलेल्या बदलांवर  तो बोललाय. 'महाराष्ट्रात जातीय आणि धर्मापोटी डोकेफोड केली जात आहे. यात रक्त सांडलं जातं. माझा धर्म, माझी जात, माझं कुटुंब, मी -माझं - मला... यापलीकडे आपण बघायलाच तयार नाही आहोत. या जाती धर्माच्या भिंती खुजा करा' असं आवाहन मराठी अभिनेता संदीप पाठकने बीडकरांना केलंय. बीडच्या माजलगाव शहरातील एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी तो बोलत होता. यावेळी बीडच्या सामाजिक स्थितीवर त्याने परखड भाष्य केलं. (Sandeep Pathak On Beed Social Situation)

काय म्हणाला संदीप पाठक? (Sandeep Pathak)

संदीप पाठक म्हणाला,"कदाचित आजूबाजूची परिस्थिती अशी आहे. जाती आणि धर्माच्या भिंतींमध्ये आपण अडकलो आहोत. आम्ही शिकत असताना या जाती आणि धर्मांच्या भिंती खूप खुजा होत्या. छोट्या होत्या. पण त्याच्यावर हळूहळू राजकीय पक्ष, राजकीय नेते, जे कोणी असतील त्यांनी हळूहळू विटांचे बांधकाम करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या बांधकामाची उंची इतकी वाढली की आपण एकटे पडत गेलो. माझा धर्म, माझी जात, माझं कुटुंब, मी -माझं - मला... यापलीकडे आपण बघायलाच तयार नाही आहोत. त्यामुळे मला असं वाटतं, उद्याचा भारत माझ्यासमोर बसलेला आहे. तुम्ही या जाती धर्माच्या भिंती खुजा केल्या पाहिजेत. करण ज्ञानेश्वर माऊली असतील, जगद्गुरु संत तुकाराम असतील, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असतील , आपल्या संतांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात जातीय आणि धर्मापोटी डोकेफोड केली जात आहे. यात रक्त सांडलं जातं. म्हणून मी रक्तदान शिबिराचा आयोजन केलं. दगड हातात घेऊन एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा एकमेकांचा हात हातात घ्या. मानवतेचा, सोबतीचा एकतेचा संदेश डोक्यामध्ये घ्या. सांडणारा रक्त एखाद्या बाटलीत एकत्र केलं तर उद्या एखाद्याला रक्ताची नितांत गरज असेल तर ते रक्त त्या माणसाला कामी येईल." असं अभिनेता संदीप पाठक म्हणालाय. 

संदीप पाठक हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या माजलगावचा आहे. त्याने अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पोस्टर गर्ल,हरिश्चंद्राची फॅक्टरी,रंगा पतंगा तसेच वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकामधून त्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Jui Gogari on Navratri: 'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Embed widget