![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raj Thackeray VS Narhari Zirwal : राज ठाकरेंना नरहरी झिरवाळांचं प्रत्युत्तर #abpमाझा
मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून पेटला असतानाच, आता आदिवासी व धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नावरुन व आरक्षणाच्याच्या मुद्द्यावर चक्क मंत्रालयातील जाळीवर उड्या घेतल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. चक्क विधानसभा उपाध्यक्षांनाच न्याय मागण्यांसाठी जाळीवर उड्या घ्यावा लागत असतील, तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित करत अनेकांनी झिरवाळ यांना व सत्ताधाऱ्यांना ट्रोल केलं. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विटरवर पोस्ट करत झिरवाळ यांना चांगलंच सुनावलं होतं. तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?, असे म्हणत जाळी नसलेल्या इमारतीवरुन उडी घेण्याचा सल्ला देखील दिला होता. आता, त्यावरुन नरहरी झिरवाळ यांनी पलटवार केला आहे.
नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांना प्रत्यक्षपणे चॅलेंजच दिलंय. मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो, मी आदिवासी आहे. जाळीवर उडी मारणाऱ्यांना कोणी सर्कस म्हणो किंवा तमाशा म्हणो पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला, असा पलटवार नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर केला आहे. तसेच, ज्यांना प्रयोग करायचा असेल त्यांनी अजून डबल जाळी लावून उडी मारावी, असा खोचटा टोलाही नाव न घेता राज ठाकरेंना लगावला.
![Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/9ecb67e0228707861336e788227911371735890129023718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला, मराठी तरुणाविरोधात तक्रार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/05ff4328ad8d324a640a893b7c18d60b1735877387683718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Cabinet meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून, कॅबिनेट बैठकीत 2 निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/177612c4600fbfb8c13d4d0d48e75df3173580730645290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/5285d7222d98a7b35132078746819e211735731216108976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Siddhesh Kadam on Mumbai Air Quality : मुंबईत प्रदूषण वाढलं, कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी कारवाई करणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/7e79865fcce9d5842db514ace3067c621735566053425976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)