एक्स्प्लोर

Jalgaon Accident: धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना

पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Jalgaon Accident: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात झालाय.  मुंबई- नागपूर महामार्गावर भरधाव कारने चौघांना  उडवल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय. या अपघातात चारही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गावाजवळील फाट्याजवळ घडली. धक्कादायक बाब म्हणजे या कारला दोन नंबरप्लेट असल्याने आणि अपघातानंतर कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला. 

Jalgaon Accident: नेमकं घडलं काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर महामार्गावरून एक एर्टिगा कार राँग साइडने येत होती. यावेळी रस्त्यावर असलेल्या चौघांना कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की चौघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुक्ताईनगरच्या हरताळा गाव  जवळील ही घटना आहे. 

दरम्यान, या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अपघात करणाऱ्या कारवर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्यामुळे या घटनेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अपघातानंतर कारमधील चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहितीही मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग

पुण्यातील ऐतिहासिकशनिवार वाडा परिसरात अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ धावपळ उडाली. शनिवार वाड्याजवळील देसाई कॉलेजसमोर झाडांचा पालापाचोळा आणि फांद्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताचअग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. मात्र वाळलेले गवत व पालापाचोळा साचल्यामुळे स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget