Powai Lake : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पवई तलावाची साफसफाई सुरू, जलपर्णीवर औषध फवारणी
Powai Lake Cleaning : गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.या मुळे आता पालिका प्रशासन देखील सज्ज झाले आहे. मुंबई उपनगरात हजारो गणेश भक्त आणि देवी भक्त पवई तलावात मूर्ती विसर्जन साठी येत असतात. मात्र या तलावात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणत जलपर्णी उगवली आहे.त्याच बरोबर अनेक गैरसोय या मंडळाच्या होत होत्या.त्यामुळे आता पालिकेने तब्बल 16 कोटी खर्च करून या तलावाची साफसफाई करण्यास आज पासून सुरुवात केली आहे. ऍग्रीकल्चरल स्प्रेइंग ड्रोन च्या सहाय्यने या तलावातील पर्णी वर औषध फवारणी केली जात आहे. त्याच बरोबर अत्याधुनिक बोटींच्या सहाय्याने तलावाची सफाई केली जात आहे. आज आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते या कामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
#ABPMajha























