Arjun Rampal Engagement With Gabriella Demetriades: 53 वर्षांच्या अर्जुन रामपालनं 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; लग्नाआधीच अभिनेता दोन मुलांचा बाप
Arjun Rampal Engagement With Gabriella Demetriades: अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स 2019 पासून एकत्र राहत असून दोघांनाही दोन मुलं आहेत. भुवया उंचावणारी बाब म्हणजे, दोघांनीही अजून लग्नच केलेलं नाही.

Arjun Rampal Engagement With Gabriella Demetriades: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत असलेला 'धुरंधर' (Dhurandhar Movie) चर्चेत आहे. या सिनेमात जेवढं कौतुक अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) साकारलेल्या रहमान डकैतचं (Rehman Dakait) कौतुक होतंय, तेवढंच कौतुक मेजर इक्बालचं (Major Iqbal ) होतंय. आदित्य धरच्या (Aditya Dhar) 'धुरंधर' (Dhurandhar) सिनेमात क्रूर पाकिस्तानी मेजर इक्बालची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन रामपालनं (Arjun Rampal) चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. त्यानं त्याची जुनी जोडीदार आणि फॅशन डिझायनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) हिच्याशी साखरपुडा केल्याचं जाहीर केलं आहे.
अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दोघेही अलीकडेच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट शोमध्ये एकत्र दिसलेले. याच पॉडकास्टमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे सांगितलं. यावेळी बोलताना अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स म्हणाली की, आमचं अजुनही लग्न झालेलं नाही. त्यापुढे बोलताना अर्जुननं दोघांनी साखरपुडा केल्याचं कबुल केलं. दरम्यान, अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स लग्नापू्र्वीच दोन मुलांचे पालक आहेत. गॅब्रिएला अर्जुनपेक्षा तब्बल 14 वर्षांनी लहान आहे. तसेच, गॅब्रिएलासोबत एकत्र राहण्यापूर्वी अर्जुन रामपालचं एक लग्न झालेलं, त्याला त्याच्या पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत.
अजून आम्ही लग्नच केलेलं नाही... : गॅब्रिएला डेमेट्रिएड्स
रिया चक्रवर्तीनं अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या पॉडकास्टचा एक नवा प्रोमो शेअर केलेला. या प्रोमोमध्ये अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स सांगते की, "आम्ही अजून लग्न केलेले नाही..." तेवढ्यात अर्जुन रामपाल पुढे म्हणतो की, "पण आमचा साखरपुडा झालाय... आम्ही तुम्हाला तुमच्या शोमध्ये हे सांगतोय..."
View this post on Instagram
या एपिसोडचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, डेमेट्रिएड्स म्हणत असल्याचे दिसत आहे, "आम्ही अजून लग्न केलेले नाही." रामपाल पुढे म्हणतो, "पण आमची साखरपुडा झाला आहे... आम्ही तुम्हाला तुमच्या शोमध्ये हे सांगत आहोत." पुढे बोलताना गॅब्रिएलानं स्पष्ट केलं की, "अर्जुन रामपालला तीव्र OCD आहे आणि मी त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे..." स्वतःबद्दल, गॅब्रिएला म्हणते की, "मी अशी आहे की, अगदी टूथपेस्ट देखील उघडी ठेवते..."
व्हिडीओमध्ये, गॅब्रिएला म्हणते की, "तुमचं प्रेम एक अट घेऊन येतं... जर कोणी असं वागलं तर, मला ते मान्य आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करतो... पण जर तुम्हाला मूल असेल तर तुम्ही ते करू शकत नाही..."
दरम्यान, गॅब्रिएला आणि अर्जुन हे दोघे 2019 पासून एकत्र राहतात आणि त्यांना दोन मुलं आहेत. अरिक आणि अरिव, अशी दोघांची नावं आहेत. यापूर्वी अर्जुन रामपालनं मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. या जोडप्याला दोन मुली आहेत, मायरा आणि महिका.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























