Mumbai Petrol Rate Hike : दरवाढीच्या भीतीने पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा ABP Majha
पाच राज्यातल्या निवडणुकांचा रणसंग्राम संपलाय. साऱ्यांचं लक्ष आता निवडणुकांच्या निकालाकडे आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर नागरिकांनाही धडकी भरली. कोणत्याही क्षणी इंधन दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरवाढीच्या भीतीने मुंबईत पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतायत. निवडणुकांचा निकाल जाहीर होताच केंद्र सरकार ही दरवाढी जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काल रात्री पेट्रोल पंपांवर पेट्रोल पंपावर नागरिकांची रांग पाहायला मिळाली. सध्या पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असले तरी एक दोन दिवसात ते सहा रुपयांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढलेत. कच्च्या तेलाच्या दरांनी रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केलीय. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत १३९ डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचलीय. त्यामुळे आता पेट्रोल कंपन्यांची भूमिका आणि केंद्र सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.