Mumbai : दिव्यांग बांधवांचा अभिनव उपक्रम, साकारल्या पणत्या, 'नाडे' संस्थेकडून दिव्यांगांना प्रशिक्षण
दिवाळी हा खरा तर दिव्यांचा आणि रोषणाईचा उत्सव! दिवाळी निम्मित प्रत्येक जण किमान एक दिवा तरी घरात लावतोच. या साठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये पणत्या खरेदी करण्याची लगबग सुरू होते. मात्र विक्रोळीच्या नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल एंटरप्राइजेस म्हणजेच नाडे या संस्थेमध्ये काही हात हे सध्या याच आकर्षक पणत्या बनविण्यासाठी काम करत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गतिमंद आणि दिव्यांगाना पणत्या बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराचं साधन दिलं जात आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या काळात, या दिव्यांगानी य बनविलेल्या पणत्या विकल्या न गेल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. परंतु या वर्षी मात्र या पणत्यांची ऑनलाइन विक्री संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. आणि त्याला प्रतिसाद देखील मिळत आहे.























