70% लसीकरण झाल्याशिवाय सर्व व्यवहार सुरू करू शकत नाही, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचं मोठं विधान
मुंबई : पुण्याऐवजी आता मुंबईतून येत्या 1 ऑगस्टपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी कोरोना लसीकरणाचा श्रीगणेशा आहे. 75 वर्षांवरील अंथरूणावर खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बीएमसी ही विशेष लसीकरण मोहीम राबवण्यासाठी तयार असल्याचं मंगळवारी हायकोर्टात स्पष्ट करण्यात आलं.
ज्येष्ठ नागरिकांसाठी दारोदारी जाऊन लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारचं धोरण तयार असून हायकोर्टात सादर करण्यात आलेल्या माहितीत कोणताही मोठा बदल न करता यावरचा अंतिम मसूदा लवकरच जाहीर करु, अशी हमी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला दिली. यावर समाधान व्यक्त करत आता कुठे आम्हाला यात आशेचा किरण दिसू लागलाय. या मुद्यावर केंद्र सरकारला अजुनही जाग आलेली नाही, मात्र राज्य सरकार आणि पालिका प्रशासन मुंबईच्याबाबतीत जागं झालं याचं आम्हाला समाधान आहे. या शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं समाधान व्यक्त केलं.
मुंबई महापालिकेकडे सध्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 3505 ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तयार केलेल्या नियमावलीनुसार येत्या 1 ऑगस्टपासून बीएमसी घरोघरी लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. हे लसीकरण प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असून येत्याकाळात हे इतरांसाठी उपलब्ध करण्यात येईल अशी आशा आहे. जेणेकरून लसीकरणाच्या मोहिमेस अधिक बळकटी येऊन, लोकांचं लसीकरण अधिक वेगानं पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भातील याचिकेवर 6 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यासुनावणीत पालिका आणि राज्य सरकार घरोघरी लसीकरणाबाबतचा आपला अहवाल सादर करतील.