(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Contaminated drinking water : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी!'या' भागात दूषित पिण्याचे पाणी
मुंबई : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील महत्वाचे भाग असलेल्या दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमध्ये पिण्याचे पाणी दूषित (Mumbai Water Issue) असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जुन्या आणि खराब पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे पाण्याच्या दूषितेत वाढ झाल्याचे निरीक्षण समोर आलं आहे. या दूषित पाण्यामुळे अतिसारासारखे आजार बळावू शकतात. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल (ईएसआर) 2020 च्या आकडेवारीनुसार, दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड यासारख्या भागात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या दूषिततेत वाढ नोंदवली गेली आहे.
या कालावधीसाठी नागरी संस्थेने तपासलेल्या एकूण 29,051 पाण्याच्या नमुन्यांपैकी 275 - 0.94 टक्के - दूषित आढळले. पाण्याच्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषण-3.4 टक्के-जी-उत्तर प्रभाग (दादर, धारावी) मध्ये आढळले. त्यानंतर 2.4 टक्के पी -दक्षिण (गोरेगाव), टी वॉर्ड (मुलुंड) मध्ये 2.3 टक्के आणि एफ-उत्तर (सायन, माटुंगा) मध्ये 2.2 टक्के इतके दूषित आढळले आहे.