Congress Protest : हमारी बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेजी? लस तुटवड्यावरुन मुंबई काँग्रेस रसत्यावर
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं. लस तुटवड्याच्या मुद्द्यावरुन हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर येथे पंतप्रधान मोदींवर टीका करणारे फलक लावण्यात आले होते. त्यामध्ये आमच्या मुलांच्या वाट्याच्या लसी परदेशात का पाठवल्या असा सवाल मोदींना करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता काँग्रेस कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीसुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोदींना लक्ष केलं होतं. लसीकरणाच्या नियोजनावरुन त्यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढत कोरोनाचं गांभीर्य सरकारला समजलंच नसल्याची शोकांतिका त्यांनी मांडली आणि त्याच मुद्द्यावरुन आता मुंबई काँग्रेसच्या वतीनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारण्यात आलं.



















