Mumbai : शिवाजी पार्क येथील सौंदर्यीकरण कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ABP Majha
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई आणि सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. सुरूवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करुन त्यानंतर रिमोट्द्वारे कळ दाबून विद्युत रोषणाईचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज पुतळा, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे म्युरल, उद्यान गणेश मंदिर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, मिनाताई ठाकरे पुतळा परिसरात सौंदर्यीकरण आणि विद्युत रोषणाई करण्यात आलीय.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात आलंय. त्यांच्या आमदार निधीतून पहिलेच हे काम आहे. सव्वा कोटी रूपये निधी खर्च केलाय.























