Mumbai Ahmedabad Highway: हायवेवर 5 कोटी लुटणारी टोळी गजाआड, खानिवडे टोलनाक्याजवळ लुटले होते 5 कोटी
Mumbai Ahmedabad Highway: हायवेवर 5 कोटी लुटणारी टोळी गजाआड, खानिवडे टोलनाक्याजवळ लुटले होते 5 कोटी
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल सव्वा पाच कोटींची लूट करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं अटक केली आहे. या टोळीतल्या चार आरोपींकडून चार कोटी ८७ लाख ५० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुजरातच्या एका व्यापाऱ्याचे तीन कर्मचारी रविवार, १७ मार्च रोजी पाच कोटी १५ लाखांची रोख रक्कम घेऊन मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन कारनं प्रवास करत होते. त्यावेळी विरारच्या खानिवडे टोलनाक्याजवळ रात्री आठच्या सुमारास चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन, त्यांना मारहाण केली. त्यानंतर या टोळीनं त्यांच्याकडची रक्कम लुटून तिथून पोबारा केला. या प्रकरणात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं वेगानं तपास करुन चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुरगनंदन अभिमन्यू, बाबू मोडा स्वामी, मनीकंडन चलय्या आणि बाला प्रभू षणमुघम अशी चार आरोपींची नावं आहेत.