(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Deshmukh :अनिल देशमुख यांच्या सुनावणीसाठी खासदार सुप्रिया सुळे सत्र न्यायालयात दाखल
मनी लाँड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आङे. देशमुख यांच्या ईडी कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिलेत. देशमुख यांच्या चौकशीसाठी नव्हे तर जबाब नोंदवण्यासाठी कोठडी हवी आहे असं ईडीने कोर्टात सांगितलं. तर दुसऱ्या कोठडीत असताना सचिन वाझेंचा जबाब घेता येतो, मग देशमुखांचा का नाही असा सवाल उपस्थित करत देशमुखांच्या वकिलांनी ईडी कोठडीला विरोध केला. अनिल देशमुख यांनीही कोर्टाला पत्र लिहून ईडी कोठडी वाढवू नये अशी विनंती केली. आतापर्यंत दोनशेहून अधिक प्रश्न विचारुन झाले असून सांगण्यासारखं काहीही नाही असं त्यांनी या पत्रात म्हटलंय. देशमुख हे 1 नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली आणि 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली.