Maghi Ganeshotsav 2021 | माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळं गेल्या कित्येक महिन्यांपासून किबहुना 2020 या संपूर्ण वर्षभरातच अनेक सणउत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी म्हणून अनेक परंपरातही खंडीत झाल्या. या साऱ्याचे परिणाम म्हणजे सध्याच्या घडीला आटोकत्यात आलेला कोरोनाचा प्रसार.
एकेकाळी धडकी भरेल अशा वेगानं हा विषाणू राज्यात आणि देशातही फैलावत होता. पण, लॉकडाऊन आणि काही निर्बंधांच्या काटेकोर पालनामुळं अशक्य वाटणाऱ्या या संसर्गावरही नियंत्रण मिळवण्यात आलं. दरम्यानच्या काळात अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण- उत्सवांचा जल्लोष रद्द झाला किंवा मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीच हे कार्यक्रम पार पडले. सध्याही परिस्थिती सावरलेली दिसत असली तरीही हे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. परिणामी अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच 15 फेब्रुवारी 2021 ला असणारी गणेश जयंती आणि तेव्हापासून सुरु होणाऱ्या माघ गणेशोत्सवासाठीही राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.