एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावले

मुंबई :   ही शान कोणाची लालबागच्या राजाची, लालबागच्या राजाचा विजय असो.....अशा जयघोषात अतिशय भावपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja Visarjan 2024)  विसर्जन करण्यात आले आहे.   मुंबईची (Mumbai) शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.  यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती. यानंतर समुद्रात 'लालबागच्या राजा' चे शाही विसर्जन करण्यात आले असून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...'च्या गजरात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. 

लालबागचा राजा  सकाळी 6 च्या सुमारास गिरगावच्या चौपाटीवर दाखल झाला.  गिरगाव चौपाटी परिसरात पहाटे पाचच्या सुमाराला मुसळधार पाऊस झाला आणि भर पावसातही विसर्जन सुरू होते.  गिरगाव चौपाटी परिसरात चिंचपोकळीचा चिंतामणी आणि माजगावचा राजा सोबत लालबागचा राजाची मिरवणूकही भर पावसात सुरूच होती.  लालबागचा राजाच्या दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची रात्र पासून गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी पाहायला मिळाली.    मुंबईतील (mumbai) लालबागमध्ये काल, मंगळवारी सकाळी 11  वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरूवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. यावेळी ढोलताशांचा दणादणाट... फटाक्यांची आतषबाजी...गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक तब्बल 23 तास  सुरू होती. 

लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात शाही थाटात विसर्जन  

हायड्रॉलिक्सचा वापर  यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja ) खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. 22 तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झालेला पाहायला मिळाला नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती.  तब्बल 23 तासांच्या उत्साहपूर्ण, जल्लोषात आणि ढोलताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात शाही थाटात  विसर्जन करण्यात आले.

मुंबई व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar FaceBook Hack : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?  शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar FaceBook Hack : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?  शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Amit Thackeray: मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Embed widget