IT Raids on Pushparaj Jain: पुष्पराज जैन प्रकरणात मुंबईमध्ये आयकर विभागाचं धाडसत्र
IT Raids on Pushparaj Jain: पीयूष जैनच्या कानपूर आणि कन्नौजमधील घरातून कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज उर्फ पम्मी जैन यांच्या घरावर आयकर आणि जीएसटी पथकांनी छापे टाकले आहेत. शुक्रवारी पहाटे आमदार पुष्पराज जैन यांच्या अनेक ठिकाणी आयकर आणि जीएसटी पथक दाखल झाले आहेत. पुष्पराज यांच्या कन्नौजच्या घरासह त्यांच्या नोएडा, कानपूर, हाथरस आणि मुंबईसह अनेक ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे 150 अधिकारी पुष्पराज यांच्या 50 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत. छाप्यात काय सापडले? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, टॅक्स चोरीच्या आरोपावरून हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पुष्पराज जैन यांच्या व्यतिरिक्त आयकर अधिकाऱ्यांनी कन्नोजमधील आणखी एका परफ्यूम व्यापारी मोहम्मद याकूब यांच्याही ठिकाणी छापा टाकत आहेत.