एक्स्प्लोर

Torres Scam : टोरेसच्या ऑफिसमध्ये पहाटे घडामोडी, 'त्या' दोघींकडून बॅगेत पैसे भरुन पसार होण्याचं प्लॅनिंग, एका फोननं प्रदीपकुमार सतर्क अन् खेळ खल्लास

Torres Scam : मुंबईतील टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांनी ज्या दोघींना अटक केली त्यांचा पसार होण्याचा डाव प्रदीपकुमार वैश्य या भाजीपाला विक्रेत्याच्या सतर्कतेनं फसला.

मुंबई : मुंबईतील तब्बल एक हजार कोटींच्या टोरेस घोटाळा प्रकरणाचा भांडाफोड भाजीपाला विक्रेता आणि व्यापारी प्रदीपकुमार वैश्यच्या सतर्कतेमुळे झाला. वैश्यनं वेळीच पोलिसांना माहिती दिली ज्यामुळं तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघींचा अन्यथा पैसे आणि त्या दोघी पसार झाल्या असत्या. टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणात ज्या प्रदीपकुमार वैश्यचे 14 कोटी अडकलेत. त्यानेच या गुन्ह्यांला वाचा फोडल्याचे तपासात समोर आले आहे.

प्रदीपकुमार वैश्य याचा टोरेस कंपनीच्या समोरील गल्लीच भाजीचा व्यवसाय आहे. होलसेल दरात तो भाजी विकतो. या गुंतवणूकीत प्रदीपकुमार वैश्यनं स्वत:चे 4 कोटी तर नातेवाईक मित्र परिवार आणि व्यापारी यांचे मिळून 14 कोटी गुंतवलेले आहेत. याच दरम्यान त्याची ओळख कंपनीतील एका कर्मचाऱ्यासोबत झाली होती.
तो प्रदीपला प्रत्येक गुंतवणूक आणि त्यावरील ऑफरची माहिती देत असे. 

गुंतवणूकदारांना काही आठवड्यांनी गुंतवणूकीवर मिळणारी रक्कम ही येणं बंद झालं.गुंतवणूकदार वारंवार दादर कार्यालयात चौकशीला येत होते. आज उद्या रक्कम मिळून जाईल नवीन वर्ष आहे. थोडं पुढे मागे होतं अशी थातूरमातूर उत्तर देऊन गुंतवणूकदारांना कर्मचारी परत पाठवायचे.मात्र प्रदीपकुमार वैश्यला संशय आला होता. प्रदीपच्या संपर्कात असलेला टोरेसाचा कर्मचाकी सोमवारी पहाटे  दादरच्या टोरेस कंपनीच्या मुख्य कार्यालयात होता.त्याच वेळी घाई गडबडीत पहाटे तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघी त्या ठिकाणी आल्या होत्या.

तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार  दादरच्या कार्यालयाच्या तिजोरीतील रक्कम एका कर्मचार्याच्या मदतीने  बॅगेत भरत होत्या.प्रदीपकमारला त्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यानं तातडीनं याची कल्पना दिली. भाजी व्यवसायासाठी पहाटेच दादरला आलेला प्रदीप त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घेऊन टोरेसच्या कार्यालयात पोहोचला.

टोरेसमध्ये काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यानं तोपर्यंत  तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघींचा पैसे घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाचा व्हिडिओ बनवला. प्रदीपकुमारनं कार्यालयाच्या गेटवर पोहचेपर्यंत अन्य व्यापारी ज्याचे पैसे टोरेसमध्ये गुंतवले होते त्यांना फोन करून बोलावले होते. थोड्याच वेळात टोरेसं कंपनीबाहेर गोंधळ उडाला. प्रदीपने पोलिसांनाही फोन करून पाचरण केले. त्यावेळी शिवाजी पार्क पोलिस घटनास्थळी दाखल होतं

स्थानिक आमदार महेश सावंतही तोपर्यंत तिथे पोहचले होते. पोलिसांनी तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार यांना ताब्यात घेतले.  टोरेस कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने प्रदीपला दिलेली माहिती, प्रदीपने तातडीने कार्यालय गाठल्याने हा भांडाफोड झाला. अन्यथा तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघीही कार्यालयातील उर्वरित रक्कम घेऊन पसार झाल्या असत्या. आर्थिक गुन्हे शाखेने ज्यावेळी दादरच्या टोरेस कार्यालयावर छापेमारी केली त्यावेळी त्यांना अंदाजे ३ कोटीच्या आसपास रोकड सापडली. त्याच बरोबर काही भेटवस्तू, गिफ्ट व्हाऊचरही सापडलेत. प्रदीपच्या सतर्कतेमुळे या टोळीचा भांडाफोड झाल्यानेच पोलिसांनी प्रदीपच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून पुढे अटकेची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतर बातम्या : 

Torres Scam : टोरेस घोटाळ्याची माहिती शिवाजी पार्क पोलिसांना सहा महिन्यांपूर्वीच? पोलिसांची चौकशी सुरू

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget