Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.
Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आज जालना (Jalna) येथे मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आणि सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना येथे आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेला महाजनआक्रोश मोर्चा सकाळी 11 वाजता मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथुन सुरु होणार आहे. अंबड चौफुली येथे सभा घेऊन मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चाला भाजप आमदार सुरेश धस हे मार्गदर्शन करणार आहेत. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत.
आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी
मोर्चानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन देखील देण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या प्रकरणाशी संबंधित लोकांवर खुनाचे गुन्हे दाखल करावेत, तसेच दोषी पोलीस अधिकारी बडतर्फ करावेत, अशा मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहे.
एक आरोपी अजूनही फरार
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना नेमकं यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
परळीत 109 मृतदेह सापडलेत, पोलीस यंत्रणेवर वाल्मिक कराडांचा कंट्रोल, अंजली दमानिया संतापल्या..