Girish Mahajan : Mohit Kamboj यांच्या मागणीबाबत Eknath Shinde - Devendra Fadnavis निर्णय घेतील
Girish Mahajan on Mohit Kamboj : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. त्याच आता भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे.





















