(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CRZ Zones : भरती रेषेपासून 50 मीटर नंतरच्या इमारतींचं पुनर्विकास करता येणार
राज्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या शेकडो इमारतींचा रखडलेला पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार आहे. कारण सागरी हद्द नियंत्रण कायदा समुद्राच्या भरतीरेषेपासून ५० मीटरपर्यंत लागू करण्याबाबत अंतीम आराखडे राज्याच्या पर्यावरण विभागाने उपलब्ध करुन दिले आहेत... त्यामुळे भरती रेषेपासून ५० मीटरनंतरच्या शेकडो इमारतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार आहे. जुन्या सागरी नियंंत्रण हद्द कायद्यानुसार समुद्राच्या भरती रेषेपासून ५०० मीटरपर्यंत मुंबई शहरात १.३३ तर उपनगरात १ इतकं FSI मिळत होतं. मात्र, यामुळे प्रकल्ब राबवताना फारसा फायदा होत नव्हता...ही मर्यादा ५० मीटर करण्यात यावी, अशी जुनी मागणी होती. ही मागणी मान्य करुन त्याचे आराखडे आता महाराष्ट्र सागरी हद्द व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे ५० मीटरपुढील गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय...