COVID Center Scam : ईडीच्या छाप्यात 150 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रं हाती : सूत्र
मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे २० हजाराच्या वर बळी गेलेत. आताआता नव्या कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाबळींची संख्या तशी फार नाहीय. मात्र एक काळ असा होता की, रोज शेकडो, हजारो लोकांचे जीव जात होते... यात मनाला चटका लावणारी गोष्ट ही होती की, कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा मृतदेहही नातेवाईकांना दिला जात नव्हता... महापालिकाच अंतविधी करत असे... मात्र हे सगळं घडत असताना, याच मृतदेह ठेवण्याच्या बॉडीबॅगच्या खरेदीतून अनेकांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी ओरपलंय... हे आम्ही नाही, तर खुद्द ईडीमधील सूत्रांनीच ही माहिती दिलीय... पाहूयात ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या भयानक काळात, कशी खाबुगिरी सुरू होती...
महत्त्वाच्या बातम्या























