CBI प्रमुख Subodh Jaiswal यांनी स्वतःलाच आरोपी मानावं; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तीवाद
सीबीआय प्रमुख सुबोध जयस्वाल यांनी स्वतःलाच संभाव्य आरोपी मानावं. असा युक्तीवाद करत राज्य सरकारनं हायकोर्टात जयस्वाल यांच्यावरच पलटवार केलाय.. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील गुन्ह्याप्रकरणी सुनावणीदरम्यान राज्य सरकारने हा युक्तिवाद केला.. काळात पोलिसांच्या बदल्या झाल्या. त्यावेळी सुबोध जयस्वाल राज्याचे पोलीस महासंचालक होते. त्यावेळी त्यांनीच पोलिसांच्या बदल्या आणि इतर शिफारशी मंजूर केल्या होत्या. ))((माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी सीबीआयनं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावलंय. या समन्सविरोधात राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीये. दरम्यान सीबीआय संचालाकच संभाव्य आरोपी असताना निष्पक्ष तपास सुरू असल्याचं सांगणं हे हस्यास्पद असल्याचंही राज्य सरकारनं हायकोर्टात कोर्टात सांगितलंय.