Bhiwandi Loksabha : भिंवडी लोकसभा निवडणुकीबाबत पत्रकारांचा निकष कुणाच्या बाजूने?
Bhiwandi Loksabha : भिंवडी लोकसभा निवडणुकीबाबत पत्रकारांचा निकष कुणाच्या बाजूने? महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघात पार पडले मागील 2019 च्या तुलनेत यावेळेस मतांमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली असून सध्या तरी 56.41% मतदान झाल्याचं आकडेवारी समोर आली आहे आणि त्या पार्श्वभूमी वर भिवंडी लोकसभे मतदारसंघात आत्तापर्यंत दुरंगी लढत होती परंतु यावेळेस विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात महाविकासचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी तगडा आव्हान उभा केला असताना अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरून चुरस निर्माण केली आणि त्यामुळे या मतदारसंघातील निर्णय आत्ता सांगणं जोखमीचे ठरणार असून निवडणुकीत बाजी अखेर कोण मारणार हे येणाऱ्या 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे परंतु तत्पूर्वी आपण या संदर्भात भिवंडीतील पत्रकार यांच्या बरोबर निवडणुकीत बाबत चर्चा केली असता त्यांनी या निवडणुकी संदर्भात आपला निकष व्यक्त केला आहे.