(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : विधानसभेला उद्धव ठाकरेंचं टार्गेल फिक्स, ते वक्तव्य राजकारणात चर्चा
Zero Hour : विधानसभेला उद्धव ठाकरेंचं टार्गेल फिक्स, ते वक्तव्य राजकारणात चर्चा
गेले अनेक दिवस वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पूजा खेडकरला यूपीएससीने दोषी करार केलं.. आणि पूजाची IAS म्हणून झालेली निवड UPSCनं अखेर आज रद्द केली. पूजाला भविष्यात UPSCची कोणतीही परीक्षा देण्यास मनाई केली आहे.. नियमापेक्षा जास्त वेळा IASची परीक्षा दिल्याप्रकरणी UPSCनं ही कारवाई केली आहे. नियमानुसार UPSC परीक्षा देण्याची मुदत संपल्यावर पूजाने तिचं नाव बदलून पुन्हा परीक्षा दिली होती. मात्र हे करताना तिनं तिच्या आई-वडिलांचं देखील नाव बदललं, त्यामुळे तिची चोरी पकडता आली नाही असं UPSCनं आपल्या निवेदनात म्हटलंय. पूजा खेडकर प्रकरणामुळे एकूणच दिव्यांग कोट्यातील सिलेक्शनवर संशयाची सुई फिरत होती.. मात्र २००९ ते २०२३ या काळात एकूण पंधरा हजार उमेदवारांचे रेकॉर्ड तपासण्यात आले, पूजा खेडकर वगळता इतर कोणीही दोषी आढळले नाही असं UPSC कडून सांगण्यात आलं... दरम्यान पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरही आज पतियाळा हाऊस कोर्टात युक्तीवाद सुरु झाला.. उद्या दुपारी ४ वाजता कोर्ट आदेश देणार आहे.
तुम्हाला आठवत असेल, पूजा खेडकरची बातमी सर्वात आधी एबीपी माझानं दाखवली होती.. आणि ती बातमी लावूनही धरली होती.. पहिल्या दिवसापासून दररोज आम्ही या बातमीचा पाठपुरावा करत राहिलो. त्यामुळे कुठल्याही सरकारी संस्थेला या प्रकरणाकडे दुर्लक्ष करता आलं नाही, आणि अखेर आज तिच्यावर कारवाई झाली.