Zero Hour : अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका, अमित शाहांचा सल्ला महायुतीचे नेते पाळतील का?
Zero Hour : अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणू नका, अमित शाहांचा सल्ला महायुतीचे नेते पाळतील का?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शाहांनी गणपती दर्शनासाठी महाराष्ट्र दौरा केला.. पण, यावेळी त्यांच्या दौऱ्याला राजकीय महत्व होतं... कारण, अवघ्या काही दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका... आणि महायुतीत सुरु असलेल्या घडमोडी... त्यांच्या याच दौऱ्यात काय काय घडलं... याची थोडी पार्श्वभूमी सांगते.. काल संध्याकाळी अमित शाह मुंबईत पोहोचले.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं... त्यानंतर अमित शाहांनी तातडीनं भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली... त्यात त्यांनी अत्यंत महत्वाच्या सुचना दिल्या.. त्याही सांगते... पहिली सुचना... महायुतीतील धुसफुस चव्हाट्यावर येऊ देऊ नका, जाहीर वाद टाळा.. दुसरी सुचना... लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या चुका झाल्या त्या त्या विधानसभा निवडणुकीत चुका टाळा... तिसरी सुचना... सर्व नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी.... चौथी सुचना... विधानसभा निवडणुका लक्षात घेता, पक्षानं लवकरात लवकर जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावेत.. आणि पाचवी सुचना.. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या... लोकसभेत पक्षांच्या वाटेला आलेलं अपयश... आणि महायुतीतील मित्रपक्षांसोबत सुरु असलेल्या कुरबुरींवरुन अमित शाहांनी नेत्यांना अत्यंत महत्वाच्या सुचना दिल्या... आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न... तो पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला..