Yogi Aadityanath On Pakistan : पाकिस्तान एक तर भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचं नष्ट होईल
Yogi Aadityanath On Pakistan : पाकिस्तान एक तर भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचं नष्ट होईल
“एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल, किंवा…”, १९४७ चं उदाहरण देत योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानच्या भविष्याबाबत मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानच्या भविष्याबाबत मोठं विधान केलं आहे. “एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल”, असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १९४७ मधील महर्षी अरविंद यांच्या एका विधानाचा उल्लेख करत मोठं विधान केलं. यासंदर्भातील भाषणाचा एक व्हिडीओही योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या या विधानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. योगी आदित्यनाथ काय म्हणाले? तसेच योगी आदित्यनाथ यांनी असंही म्हटलं की, “जर १९४७ मध्ये भारतामधील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती तर कोणतीही शक्ती देशाची फाळणी करू शकली नसती. १९४७ मध्ये जे चित्र पाहायला मिळालं होतं, तेच चित्र आज बांगलादेशात पाहायला मिळत आहे. बांगलादेशमधील लोक आज स्वत:ला वाचवण्यासाठी कशापद्धतीने धडपडत आहेत. मात्र, आपला संकल्प आहे की, महर्षी अरविंद यांनी १९४७ आधी एक घोषणा केली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, अध्यात्मिक जगात पाकिस्तानचे काहीच वास्तव नाही. एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल. कारण अध्यात्मिक जगात ज्यांचं काहीच वास्तव नाही. ते नष्टच होणार आहे. त्यामुळे आपणही त्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आपणही म्हटलं पाहिजे की ते होईल. त्यासाठी आपणही तयार झालं पाहिजे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.