(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Worli Hit and Run Case : मिहीरच्या दोन बहिणींचा क्राईम ब्रँचनं नोंदवला जबाब
Worli Hit and Run Case : मिहीरच्या दोन बहिणींचा क्राईम ब्रँचनं नोंदवला जबाब हिट अँड रन प्रकरणी (Hit And Run Case) मुख्य आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बेड्या ठोकल्या आहेत. त्यासोबतच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मिहीरला अटक झाल्यानंतर रात्री उशिरा गुन्हे शाखा 3 मध्ये मिहीरसोबतच आई, दोन बहिणी आणि मित्रांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run Case) आरोपी मिहीर शाहानं कबुलीनामा दिला आहे. अपघातावेळी गाडी चालवत असल्याची कबुली मिहीर शाहानं मुंबई पोलिसांना दिली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेनंतर आरोपी मिहीर शाहानं दिलेल्या कबुलीमध्ये, घटनेच्या वेळी तोच गाडी चालवत होता, असं त्यानं सांगितलं आहे. त्यासोबतच मिहीरच्या बहिणीनं या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल, या भितीनं आम्ही घर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली. मिहीर आणि त्याचं कुटुंब दोन गाड्यांनी शहापूरला गेलं. शहापूरला एका पंजाबी व्यक्तीनं त्यांची शहापूरला राहण्याची व्यवस्था केली. या पंजाबी व्यक्तीचे शाह कुटुंबियाशी जुनं आणि घरचे संबध असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. फरार होण्यापूर्वी आरोपीनं दाढी मुंडवली असल्याचा पोलिसांना संशय आहे. जेणेकरून त्याला ओळखता येणार नाही. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना सापडलेल्या कालखंडाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची चौकशी केली आणि सर्व वेळापत्रकाची पुष्टी केली.