Web Exclusive : Ratnagiri : Jan Ashirwad Yatra मध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद ABP Majha
नारायण राणे यांच्या कोकणातील जनआशीर्वाद यात्रेवेळी चोरांनी केलेल्या चोरीची चर्चा अगदी जोरात झाली होती. दरम्यान, यामध्ये आता रत्नागिरी पोलिसांनी 7ृसात जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले सर्वजण हे मुळचे बीड येथील असल्याची माहिती यावेळी पोलिस अधिक्षकांनी दिली. दरम्यान, या टोळीकडून मोबाईल, कार, रोकड आणि चार सोन्याच्या चेन असा तब्बल 4 लाख 38 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं पोलिस अधिक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. शिवाय, अद्यापही या साऱ्या प्रकरणाचा तपास सुरू असून ताब्यात घेतलेल्या सातही जणांचा यापूर्वी देखील अशाच गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं देखील तपासातून समोर येत आहे.























