एक्स्प्लोर
Weather Alert: नाशिकमध्ये Yellow Alert, पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत!
नाशिक (Nashik) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानंतर आता हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 'पुढील दोन दिवस देखील पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे'. संपूर्ण जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला असून, विशेषतः घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बागलाण (Baglan), मालेगाव (Malegaon), चांदवड (Chandwad), दिंडोरी (Dindori), आणि इगतपुरी (Igatpuri) या तालुक्यांमध्ये यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. सध्या कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशा बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
वर्धा
भारत
Advertisement
Advertisement
















