Vinod Nikole on Kisan Long March : शेतकरी उद्या आंदोलन मागे घेणार - विनोद निकोले
Vinod Nikole on Kisan Long March : शेतकरी उद्या आंदोलन मागे घेणार - विनोद निकोले
शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आज शेतकरी मोर्चा माघारी घेणार आहेत. त्यामुळे लाल वादळ माघारी फिरणार असल्याचे म्हटले जातेय. तर काही मागण्या विचारधीन आहेत. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असे इंद्रजित गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं.
शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आंदोलकांच्या मागण्यासंदर्भामध्ये निवेदन पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली. तर शेतकऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाला दिली.