Parbhani : परभणीत Somnath Suryavanshi यांचा मृतदेह दाखल, अंत्यसंस्कारही परभणीतच होणार
Parbhani : परभणीत Somnath Suryavanshi यांचा मृतदेह दाखल, अंत्यसंस्कारही परभणीतच होणार
परभणी : संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याचा दाव्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उफाळला. समस्त आंबेडकरी संघटना, आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi Death) या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता. मात्र आता शवविच्छेदनाच्या अहवालातून Shock following multiple injuries हे कारण समोर आल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. विरोधी पक्षाचे नेते पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतायत. असे असतानाच आथा सोमनाथ सूर्यवंशी हा तरूण नेमका कोण आहे? असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे या तरुणाबद्दल जाणून घेऊ या...
शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे?
न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचे छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाची सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे. याच शवविच्छेदनातून सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. सुरुवातीला सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असाताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, असा दावा करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार सूर्यवंशीच्या मृत्यूचे कारण हे Shock following multiple injuries असे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सूर्यवंशीचा मृत्यू मार लागल्याच्या धक्क्यातून झाल्याचे शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे.