एक्स्प्लोर

माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काही जणांकडून या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे.

बीड : जिल्ह्यातील मसाजोग गावच्या सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी तपासाचा मुद्दा उपस्थित करत थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन गावकऱ्यांचा संशय असल्याचे म्हटले. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंकडेही बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देत याप्रकरणी तपास सुरू असून पोलिसांवरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. आता, यावरच देशमुख यांच्या भावाकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही. राजकारण्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून बीड जिल्ह्यात जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आणि ओबीसी अशी विभागणीही येथील काही गावांत दिसून आली होती. 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काही जणांकडून या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच, आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेत हा मुद्दाही उपस्थित झाला होता. त्यावर, फडणवीसांनी माहिती देताना, याप्रकरणी एसआयटी नेमली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. आता, धनंजय देशमुख यांनीही एसआयटीवर विश्वास ठेवावा लागेल, असे म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात SIT नेमली असून त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ते लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करतील. तर या प्रकरणात जातीवादाचा काहीच संबंध येत नाही, असं देखील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे, याप्रकरणाला जातीय रंग देण्याचा होत असलेला प्रयत्न चुकीचा असल्याचे धनंजय देशमुख यांनी सूचवले आहे. मात्र, याप्रकरणात राजकीय किंवा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या दबावातून चालढकलपणा किंवा काहींना सूट देण्याचा प्रकार घडतोय का, याचीही चर्चा जिल्ह्यात होत आहे.   

सीआयडी पथक मस्साजोगमध्ये दाखल

दरम्यान, सीआयडी पथक आज मस्साजोगमध्ये दाखल झाले आहे, सीआयडीचे आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 7 दिवस पूर्ण होतात. विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे. सीआयडीचे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे. सीआयडीचे संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले, तसेच घटनेबाबत माहिती देखील जाणून घेतली.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलंPrakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकरAshok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
Embed widget