एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. त्याचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत  35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झालं आहे. महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं. राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 मध्ये सुरु करण्यात आली. या योजनेसाठी एकूण 46 हजार कोटी वर्षाकाठी लागणार होते. मात्र, योजना जुलै 2024 ते मार्च 2025 यासाठी एकूण 36 हजार कोटी लागणार होते. तशी तरतुद राज्य सरकारने केली आहे. यापैकी 17 हजार कोटी जुलै ते नोव्हेंबर वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 19 हजार कोटी शिल्लक आहेत. 

आताच्या पुरवणी मागणीत  1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद प्रशासकीय पुर्ततेसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता साडेतीन हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्चपर्यंत 14 हजार कोटी रुपये लागणार आहेत.
आताची तरतूद आणि मागील बाकी मिळून 20 हजार 400 कोटी शिल्लक आहेत. 

1400 कोटी रुपयांची तरतूद ही काही प्रशासकिय पुर्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे निवडणूक काळात लाडक्या बहिणीसांठी केलेल्या 2100 रुपयांच्या घोषणे संदर्भात काहीच निर्णय अद्याप झाला नसल्याच यावरुन स्पष्ट होतंय.

लाडक्या बहिणींना  2100 रुपये कधी मिळणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेतून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात रक्कम पाठवली जाते. राज्य सरकारनं जुलै ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंतचे पाच हप्त्यांचे  1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये दिले गेले आहेत. आता महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीनं महिलांना दरमहा  2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपयांच्या बाबत भाष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार करु असं म्हटलं होतं, त्यामुळं लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल. 

इतर बातम्या : 

मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेतील 16 लाख अर्जांची छाननी होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलंPrakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकरAshok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
Embed widget