एक्स्प्लोर
Raj Thackeray : 'निवडणुका मॅच फिक्सिंग, निकाल आधीच ठरलाय', राज ठाकरेंचा गंभीर आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदार यादीवरून (Voter List) निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. 'तुम्ही मत द्या, किंवा नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे', असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीत तब्बल ९६ लाख बोगस मतदार घुसविण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. जोपर्यंत याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. मुंबईत मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी आमदारांचे व्हिडिओ सादर केले, ज्यात भाजपच्या मंदा म्हात्रे (Manda Mhatre), अजित पवार गटाचे सतीश चव्हाण (Satish Chavan) आणि शिंदे गटाचे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मतदार यादीतील त्रुटींवर भाष्य केले होते. इतकेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडिओ दाखवत, ज्यात मोदी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न विचारत होते, राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर दुहेरी हल्ला चढवला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
करमणूक
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















