Vaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घेतलेला निलेश विकृत, स्वतःच्याच पत्नीचा तयार केला MMS
Vaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घेतलेला निलेश विकृत, स्वतःच्याच पत्नीचा तयार केला MMS
Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death) सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक (Rajendra Hagawane and Sushil Hagawane arrested) करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.
कस्पटे कुटुंबीयांच्या (वैष्णवीच्या माहेर) तक्रारीवरुन निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी वैश्नवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हीसकाऊन लावले होते . कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. वैश्नवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय. निलेश चव्हाण हा वैनवीचा नवरा शशांक आणि वैश्नवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे.
निलेश चव्हाण स्वतःच्या पत्नीचाही करायचा अमानुष छळ-
वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिला आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे.




















