(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray PC : केंद्रात विषय मांडा, मोदींवर परिणाम झाला नाही तर 48 खासदारांनी राजीनामा द्या
Uddhav Thackeray Full PC : मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींना भेटण्याची तयारी, सर्व 48 खासदारांनी राजीनामा देऊन एकजूट दाखवा: उद्धव ठाकरे
मुंबई : मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना देखील भेटण्याची तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे. जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. जर एवढे करून देखील पंतप्रधानांवर (PM Modi) परिणाम होणार नसेल तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी उपसमितीची जी बैठक घेतली त्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालाय तर दुसरे उपमुख्यमंत्री भाजपच्या प्रचारात व्यस्त होते.राज्य जळत असताना उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात होते. विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न मार्गी लावता येत असतील तर लावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.