(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trimbakeshwar Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Trimbakeshwar Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून हॉटेल्स तसेच व्यावसायिकांची सध्या तपासणी केली जात असून त्र्यंबकेश्वरमध्ये महादेव मंदिराबाहेर कलाकंद तसेच बर्फीच्या नावाखाली विकला जाणारा भेसळयुक्त मावा सदृश्य अन्न पदार्थ अन्न औषध प्रशासनाने जप्त करत प्रसाद विक्रेत्यांना दणका दिलाय. मे. भोलेनाथ स्विट्समधून ३७ हजार ४४० रुपयांचा ७८ किलो कुंदा आणि श्री नित्यानंद पेढा सेंटरमधून सहा हजार ६०० रुपयांचा २२ किलोचा माल असा एकूण ५४ हजार ४४० रुपयांचा भेसळयुक्त प्रसाद जप्त करण्यात येऊन तो घंटागाडीमध्ये टाकून नष्ट करण्यात आलाय. तपासणीसाठी या अन्न पदार्थांचे नुमने अन्न विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच पुढील करवाई केली जाणार आहे.