TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha
बुलढाण्यातली कळंबेश्वर गावात अवैध धंदे बंद केल्याने संतापलेल्या गावगुंडांचा सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला, अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्साजोगचा सरपंच करु, सुभाष खपरद यांना धमकी देत केला हल्ला, ५ जणांवर गुन्हा दाखल.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना, आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास. यामध्ये एकूण १० अधिकाऱ्यांचा समावेश.
संतोष देशमुख हत्याप्रकणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर ३०७ चा गुन्हा तर फरार कृष्णा आंधळेवरही धारूर पोलीस ठाण्यात ३०७ चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती, याप्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत १३० जणांची चौकशी.
बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, आजच अचानक पलंग कसे मागवले? रोहित पवारांचा सवाल, पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा, पवारांची एक्स पोस्ट.
बीड प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलंय, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, राष्ट्रावादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, आज दुपारी १२ वाजता मंत्रालयात बैठक, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता.
महामंडळाकडून १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, आज मंत्रिमंडळ याला मान्यता देतं का याकडे लक्ष
ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या बैठका ७, ८ आणि ९ जानेवारीला होणार, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघनिहाय उद्धव ठाकरे घेतायत आढावा.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या दोन दिवसांत भूमिका मांडणार, दोन दिवसांपूर्वी साळवींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती.