Astrology : आज रवि योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
Panchang 02 January 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी रवि योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 02 January 2024 : आज गुरुवार, 2 जानेवारीला चंद्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून या दिवशी हर्ष योग, रवियोग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज वृषभ राशीचे लोक आळस झटकून कठोर परिश्रम करण्यावर लक्ष केंद्रित करतील आणि धार्मिक गोष्टींतही सक्रिय सहभाग घेतील. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर आज तुमची इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. नोकरीच्या ठिकाणी आज एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपेने प्रलंबित कामं पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना देखील बनू शकते. व्यावसायिकांना नवीन वर्षाच्या योजनेचा लाभ मिळेल, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. तुम्ही संध्याकाळचा वेळ कुटुंबातील लहान मुलांसोबत घालवाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
आज, म्हणजेच 2 जानेवारीचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कर्क राशीच्या लोकांच्या बोलण्यात आज गांभीर्य राहील, त्यामुळे लोक तुमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकतील. तसेच, तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याकडून सल्ला घेऊ शकतात. वडिलांसोबतच्या नात्यात काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येतील. या राशीचे लोक ज्यांना प्रवास, शिक्षण किंवा नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. नोकरीत असलेल्यांना आज अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. संध्याकाळ मित्रांसोबत मजेत घालवाल.
कन्या (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशेचा किरण घेऊन आला आहे. कन्या राशीच्या लोकांनी आजसाठी नियोजित केलेली सर्व कामं अचानक भगवान विष्णूच्या कृपेने पूर्ण होतील. भाड्याने राहणाऱ्यांचं स्वत:चं घर आणि वाहन असावं, हे स्वप्न साकार होत असून त्यांना चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. आज व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखतील आणि इतर काही व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात. तुमच्या सासरशी तुमचे संबंध दृढ होतील आणि तुम्हाला त्यांच्याकडून आर्थिक लाभ आणि अनेक प्रकारची मदत मिळू शकेल.
मकर (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. जर तुम्हाला कोणतीही मालमत्ता खरेदी-विक्रीची चिंता असेल तर आज तुम्हाला त्यावर उपाय मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे करिअर मजबूत होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला सुसंवाद राखण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे दोघांमध्ये परस्पर समंजसपणा वाढेल. संध्याकाळी मित्रांसोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मीन (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. मीन राशीच्या लोकांनी आज कोणतेही काम आत्मविश्वासाने केले तर त्याचा तुम्हाला नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही घर किंवा नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला फायदेशीर डील मिळवून देऊ शकते. नोकरदार लोकांचे अधिकार वाढतील, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांचा प्रभाव वाढेल. तुम्ही तुमच्या पालकांसोबत संध्याकाळी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: