(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 June 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 June 2024 : ABP Majha
१ भारतानं तब्बल १७ वर्षांनी पुन्हा जिंकला ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक, थरारक फायनलमध्ये रोहितसेनेची दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात, बुमरा, अर्शदीप, हार्दिकचा प्रभावी मारा, कोहली सामनावीर
२. विराट कोहली आणि रोहित शर्माचा ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम;
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाच्या व्यासपीठावर आजी-माजी कर्णधाराची मोठी घोषणा
आगामी निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जायचं, भाजप प्रभारींचे कोअर कमिटी सदस्यांना निर्देश..तर बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला
२०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंचं टीकास्त्र, अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत
विधीमंडळात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरुन घमासान..निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनेची घोषणा, विरोधकांचा आरोप तर लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक हक्कभंग आणण्याच्या तयारीत
रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना त्यांच्या आयुष्यातली सर्वात अनमोल भेट दिली. ती भेट होती ट्वेन्टी२० विश्वचषकाची. राहुल द्रविड यांनी त्यांच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक अशी ओळख निर्माण केली होती. पण १६ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना वन डे किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं सुख कधीच लाभलं नव्हतं. अखेर भारतीय संघाचे प्रशिक्षक या नात्यानं राहुल द्रविड यांना ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं समाधान मिळालं. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा खास रिपोर्ट.