TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20 डिसेंबर 2024 : ABP Majha
मुंबई महानगर पालिकेच्या के इस्ट वार्ड मधील पद निर्देशित अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. मंदार तारी असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, महापालिकेतील अधिकारी लाच घेताना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अधिकची माहिती अशी की, अंधेरीतील एका प्लॉटचे बांधकाम न तोडण्यासाठी अधिकाऱ्याकडे तक्रारदाराकडे 2 कोटीची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 7 ऑगस्ट 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर तारी यांनी एका खासगी व्यक्तीस लाचेचा पहिला हप्ता म्हणून 75 लाख स्वीकारण्यास सांगून तेथून पळ काढल्याची महिती पोलिसांनी दिली. याच लाचेचा गैरलाभ मिळवण्यासाठी तारी यांनी प्रयत्न केल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. खासगी व्यक्तीकडून तारी यांनी 75 लाखाची रक्कम स्वीकारली होती. त्यावेळी 2 खासगी व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा पासून तारी हे फरार होते.