TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 March 2024 : ABP Majha
तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस बीडला रवाना, आज कोर्टात करणार हजर
सतीश भोसलेने वनविभागाच्या जागेवर बांधलेल्या घरावर बुलडोझर...घरातील उर्वरीत साहित्याला अज्ञातांकडून आग...
राज्यभरात आज धुलिवंदनाचा मोठा उत्सव, मुंबई-ठाण्यात मराठी कलाकारही रंगात रंगणार तर राजकीय नेतेही साजरी करणार धुळवड.
राज्यभरात होळीचा उत्साह...कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यांनी होळी सणाचा उत्साह, तर कोकणात गावागावात पारंपारिक शिमगोत्सवाची सुरुवात
होळी, धूलिवंदन, रमजाननिमित्त मुंबईत पोलीस बंदोबस्त...पाच अतिरिक्त सहआयुक्त, १८ डीसीपी, ५१ सहपोलीस आयुक्तींची टीम. पाच आरसीपी कंपनी, आठ क्यूआरटी पथकांसह बॉम्बशोधक पथकही तैनात...
लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचे पैसे वळवल्याची माहिती,
सामाजिक न्यायाचे तीन हजार तर आदिवासी विभागाच्या चार हजार कोटींना कात्री...दोन्ही विभागांची अर्थमंत्र्यांवर नाराजी
जयंत पाटील थोड्याच दिवसांत दादांसोबत येणार, संजय शिरसाटांचा दावा...विधानसभा निवडणुकीनंतर पाटील नाराज, मुश्रीफांचाही दुजोरा...
आमिर खाननं दिली तिसऱ्या प्रेमाची कबुली...25 वर्षांपासून मैत्रीण असलेल्या गौरीसोबत डेट करत असल्याचं केलं जाहीर...






















