(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 2 PM : 05June 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 2 PM : 05June 2024 : ABP Majha
एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची ६ आणि ७ जूनला राजधानी दिल्लीत होणार बैठक, राज्यातील शिवसेना शिंदे गट, अजित पवारांच्या पक्षाचे खासदार आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं, आजच्या दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीनंतर उद्या मविआच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती.
महाराष्ट्रात मविआचा महायुतीला धोबीपछा़ड, आतापर्यंत महायुतीला १७ तर मविआला ३० जागा.
यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी, १३ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
एनडीएचं बहुमत डळमळीत टेकूवर, ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारूण पराभव, लोकशाहीचा हुकूमशाही झुंडशाहीवर विजय, सामनाच्या अग्रलेखातून टीका.
इंडिया आघाडीत नेतृत्वाचे वाद नाहीत, राहुल गांधींनी नेतृत्व करावं असं ठाकरे गटाचं म्हणणं, राहुल गांधींनी दुसरं नाव सुचवलं तरी चालेल, खासदार संंजय राऊतांची प्रतिक्रिया,