Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 June 2024 एबीपी माझा 11 PM
सध्याचं काम सुरुच ठेवा, राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शाहांचा सल्ला, मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय होणार..
मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी
शिवसेनेकडून २, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी, महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला ३ कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता
लोकसभा निकालांनंतर शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता, शिंदेंच्या शिवसेनेतले ५ ते ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात, ठाकरे गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती, शिंदे गटाच्या शिरसाटांचा पलटवार
कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार, फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंचा निर्णय, अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा
नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार, राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण, शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात लगबग
सौरभ नेत्रावळकरचं खरं तर मुंबई आणि भारताकडून क्रिकेट खेळण्याचं स्वप्न होतं. पण त्याच्या आयुष्याला अशी कलाटणी मिळाली की, तो थेट अमेरिकेत जाऊ पोहोचला? तुमच्या आमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर त्याचे वडील नरेश नेत्रावळकर आणि बहीण निधी नेत्रावळकर यांच्याकडून जाणून घेतलीयत आमचा प्रतिनिधी अमेय राणेनं.
महायुतीतले आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा दावा ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी तो दावा खोडून काढला.