TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : टॉप 100 न्यूज : 02 June 2024
नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची हॅट्रीक होणार, एनडीएला ३५३ ते ३८३ च्या दरम्यान जागा मिळणार, एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज...
भाजपला ३१५ जागा मिळणार, काँग्रेसला ७४ जागा मिळण्याची शक्यता...एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज...
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच...महायुतीला २४ तर मविआला २३ जागा...एबीपी माझा सी वोटर सर्व्हेचा अंदाज...
एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक १७ जागा...पण दोन पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही...ठाकरेंच्या शिवसेनेला ९, तर शिंदे गटाला ६ जागा मिळणार...
कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश...काँग्रेसलाही फायदा...पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याचा अंदाज...
पक्षांच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो... पराभव झाला तरी खचणार नाही ... एक्सिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये आज विधानसभेसाठी मतमोजणी... अरुणाचलमध्ये २८ जागांवर भाजप आघाडीवर
सिक्कीममध्ये विधानसभेसाठी आज मतमोजणी सुरू... ३२ पैकी २९ जागांवर सिक्कीम क्रांती मोर्चाची आघाडी... SKM सत्ता कायम राखण्याची शक्यता
अरविंद केजरीवाल आज पुन्हा तुरुंगात जाणार.. कोर्ट अंतरिम जामीनावर ५ जूनला निकाल देणार..
ठाणे स्थानकावरील फलट क्रमांक ५ आणि ६च्या रुंदीकरणाचं काम वेळेआधीच पूर्ण होणार... सर्व चाचण्याकरून साडेबारापर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती
पुणेकरांसाठी खुशखबर... हिंजवडी-शिवाजीनगर मार्गासाठी पहिली मेट्रो पुण्यात दाखल... प्रत्येकी तीन डबे असलेल्या एकूण २२ ट्रेनचा संच दाखल
विठ्ठल रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन आजपासून सुरू... तब्बल ७९ दिवसांनंतर विठुरायाचा चरण स्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
मुंबईकरांची मान्सूनची प्रतिक्षा लवकरच संपणार.. ४ ते ५ जून दरम्यान मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज
आजपासून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू.....अमेरिका आणि कॅनडामध्ये पहिला सामना रंगणार