(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 08 June 2024
नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार, राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण, शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात जोरदार तयारी
एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी मोठी बैठक, मंत्रिमंडळाच्या आराखड्यावर चर्चा, एनडीएच्या नेत्यांसोबत बातचीत
दिल्लीत आज काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठका... लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीवर प्रामुख्याने चर्चा होणार.
भाजपची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक... भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं... बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेणार
सध्याचं काम सुरुच ठेवा, राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शाहांचा सल्ला... मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय होणार..
मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी
शिवसेनेकडून २, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी, महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला ३ कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता
एनडीएच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत चर्चा नाही, तर मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी नड्डा, राजनाथ सिंहांकडे विनंती..अजित पवारांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया
कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार, फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंचा निर्णय, अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा
राज्यात अनेक ठीकाणी जोरदार पाऊस, सोलापुरात तीन गावांमध्ये वीज कोसळल्याची घटना दोघांचा मृत्यू, तर नाशिकच्या दिंडोरीत शेतात पाणी साचलं