Anil Deshmukh Arrested By ED : 'आरोप ते अटक' अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईचा संपुर्ण घटनाक्रम...
Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडी चे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्ली वरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते.त्यांनी देखील देशमुख यांनी चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडी ने अटक केली.याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.त्यानंतर रात्री ३ वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करीत होते.रात्री ३ वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालय मधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत अशी माहिती दिली.आज सकाळी १० वाजता देशमुख यांना मेडिकल साठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल, तिथून ठीक 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.किमान सात दिवसाची तरी ईडी न्यायालयात देशमुख यांची कस्टडी न्यायालयात मागण्याची शक्यता आहे.त्यामुळे आज ईडी आणि न्यायालयत येथे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत.