Maharashtra :दुग्धविकास आणि पशुसंवर्धन विभागाचं एकत्रीकरण,शासकीय दूध डेअऱ्यांना फटका बसण्याची शक्यता
Maharashtra :दुग्धविकास आणि पशुसंवर्धन विभागाचं एकत्रीकरण,शासकीय दूध डेअऱ्यांना फटका बसण्याची शक्यता
राज्य सरकार दुग्धविकास आणि पशुसंवर्धन या दोन विभागाचं एकत्रीकरण करणार आहे. सध्या या दोन विभागाची दोन वेगवेगळी आयुक्तालये आहेत, त्याऐवजी एकच आयुक्तालय करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. पण यामुळे सध्या राज्यात असलेल्या शासकीय दूध डेअऱ्या बंद कायमस्वरुपी बंद होतील. याचा सर्वात मोठा फटका महानंद दूध या शासकीय दूध डेअरीलाही बसू शकतो. राज्यात सध्या ७० टक्के दूध संकलन हे खाजगी आणि सहकारी दूध संघामार्फत होतं तर फक्त ३० टक्के दूध संकलन हे शासकीय दूध डेअऱ्यामार्फत होतं. राज्यातील अनेक दूध डेअऱ्या बंद पडल्या आहेत, त्या पुनरुज्जीवीत होण्याची शक्यताही मावळली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या दोन्ही विभागाकडे सध्या अकरा हजार कर्मचारी संख्या आहे, त्यांचं एकत्रीकरण झाल्याने पुरेशई कर्मचारी संख्या पशुसंवर्धनासाठी उपलब्ध होईल असंही सांगितलं जातंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत, राहुल कुलकर्णी