Swapnil Lonkar Suicide : दोन वर्षांपासून मुलाखती नाही, काय करायचं? MPSC विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल
पुणे : MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असं या 24 वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. स्वप्नीलने 2019 आणि 2020 मधे झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवलं होतं. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही.
2021 मध्ये झालेली एम पी एस सी ची प्राथमिक परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. स्वप्नील लोणकर हा मुळचा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून तो कुटुंबांसह पुण्यात राहत होता. स्वप्नीलचे वडील पुण्यातील शनिवार पेठेत बिल बुक छापण्याचा व्यवसाय करतात तर स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर स्वप्नील एम पी एस सी परीक्षेची तयारी करत होता.
स्वप्नीलच्या या आत्महत्येमुळे एम पी एस सी च्या रखडलेल्या परीक्षांचा प्रश्न किती तीव्र बनलाय हे पुन्हा एकदा दिसून आलंय. स्वप्नीलला दहावीत 91 टक्के मार्क मिळाले होते तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच तो अनेक सामाजिक उपक्रमांमधेही तो सहभागी होत होता. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालो की गावाकडे घर बांधण्यासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडायचे असं स्वप्नीलच स्वप्न होतं. मात्र मागील दोन वर्षांत परीक्षाच झाली नाही तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत गेला असं स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधे म्हटलयं. स्वप्नीलने बुधवारी फुरसुंगी भागातील गंगानगर भागातील राहत्या घरी आत्महत्या केलीय.
![Top 80 at 8AM Superfast 01 February 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/efe8cde6001b971ae36b8ae89b8ba6f617383795552541000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Shirsat Interview : दोन 'शिवसेना' झाल्या याचं दुःख, दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/4036dcbd30aa5503ee12ee1e5f87199017383791499441000_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 01 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/270977b54ac809ce1ef26d62cf48037717383778381431000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 70 at 7AM Superfast 01 February 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/642606e0a469b33b3848e52aadd159a917383769403501000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 01 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/d6120266489bfb8bffefe8cbbf8d47c617383745546371000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)